महाराष्ट्र राज्यातील नव्हे, तर देश भरातील ज्येष्ठ नागरिक म्हणजेच ज्यांचं वय ७० च्या पुढे आहे.अशा सर्वांना शासनाच्या आरोग्याच्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर,एका मोठ्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.ही समस्या म्हणजेच स्वतःची केवायसी करावे लागेल. अन्यथा तुम्ही शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत असाल तर अडचणींना सामोरे जावं लागेल. म्हणून अडचणी येऊ नये यासाठी तुमच्या परिसरातील ऑनलाइन सी एस सी सेंटर धारक यांच्याकडे जाऊन केवायसी करून घ्यावी जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अडचणी व तुमच्या आरोग्याची समस्या असेल आणि शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर केवायसी नसल्यास तुम्ही लाभ घेऊ शकणार नाही. म्हणून त्यासाठी वयाच्या ७० पासून पुढील ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःचे वय वंदना कार्ड करून घ्यावे.


