डॉ नीलकंठ पाटील वृंदावन हॉस्पिटल पाचोरा संचालक म्हणाले आपण नेहमी हेच म्हणत असतो की शेतकऱ्याचा मुलगा हा शेतकरीच असणार,डॉ चा मुलगा डॉक्टर असेच ऐकत आलेलो आहे.मात्र ते आमच्या वडिलांनी खोडून काढले.आम्हाला उच्च शिक्षित डॉक्टर बनवले.खरे तर आमचा प्रवास सर्व सामान्य व्यक्ती प्रमाणेच होता आणि आहे.शाळेत जाण्यापूर्वी सकाळी शेतात काम करणे आणि मग शाळेत जाने .आमचे प्राथमिक शिक्षण हे जी प शाळेत झाले.आणि माध्यमिक शिक्षण इंग्लिश स्कूल भडगाव इथे झाले.पुढील शिक्षण कोल्हापूर आणि अलीगड मुस्लीम युनिवर्सिटी उत्तर प्रदेश इथे झाले.गावी असताना माझे नियमित काम म्हणजे शेतात वडिलांनी ठरवून दिलेले काम करणे.आणि जिथे कमी तिथे मी या भूमिकेने नेहमी कार्य करत राहणे हाच स्वभाव राहिला. शेतकरी तरुणांनी हे ठरवले तर काहीही करू शकतात फक्त ठरवणे आणि त्याला पूरक असे वातावरण तयार केले तर तो ठरवलेल्या लक्ष्याला प्राप्त करू शकतो आणि तेच आम्ही केले.आज मी आणि माझे मोठे बंधू डॉ विजय पाटील स्त्रीरोग तज्ञ झाले,आणि माझी बहिण बी एच एम एस झाली.आम्ही तिघे ही डॉक्टर झालो शेतकऱ्याचे मुल डॉक्टर होवू शकतात हे आम्ही सिद्ध करून दाखवले.