पिंपळगाव हरेश्वर लोकशाहीर आण्णा भाऊ साठे नगर मध्ये समस्त समाज बांधव यांचा माध्यमातून लोक शाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच गावातून शोभा यात्रा काढण्यात आली.या वेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच,उपसरपंच,विवीध समाजातील प्रतिष्ठित नागरिक,आणि पिंपळगाव पोलीस स्टेशन ए पी आई प्रकाश काळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.या वेळी डॉ नीलकंठ पाटील वृंदावन हॉस्पिटल संचालक म्हणाले की एकदा आण्णाभाऊ साठे यांचे जीवनचरित्र प्रत्येकाने वाचायला हवे.जे व्यक्ती मत्व विश्वभर प्रशिद्ध आहे.ज्यांचा पुतळा देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून मास्को येथे स्थापन करण्यात आला.गावातून जल्लोषात शोभा यात्रा काढण्यात आली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवदास पवार समाज अध्यक्ष,लक्षमन पवार,संजय पवार,मुकेश पवार अनुलोम प्रतिनिधी सचिन खैरे यांनी केले प्रयत्न.